न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२३) :- शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी थेरगाव येथे आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवास भेट देण्यासाठी येणार आहेत अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
सोमवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे हे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या समवेत थेरगाव – वाकड रोड येथील ॲड. सचिन भाऊ भोसले युवा मंच, न्यू आझाद युवक संघ, जिजाऊ महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात देवीच्या आरतीसाठी येणार आहेत.














