- मा. स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांची महापालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 ऑक्टोबर 2023) :- कुदळवाडीत स्वी. सदस्य दिनेश यादव यांनी आरोग्य निरीक्षक केबिन बसवण्याची मागणी केली आहे.
दहा लाख रुपयांचे काम फ प्रभाग क्षेत्र कार्यालयाला सुचवण्यात आले आहे. तसे पत्र ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांना यादव यांनी दिले आहे.
आगामी आर्थिक वर्ष 2024 25 च्या अंदाजपत्रकासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांच्या सूचना मागितल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग असावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नागरिकांकडून महापालिकेने सुचना मागविल्या आहेत. महापालिकेच्या संकेतस्थळावर व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सूचना नागरिकांना करता येणार आहे.

















