न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑक्टोबर २०२३) :- सुदवडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ५ नोव्हेंबरला होत आहे. सरपंचपदासाठी आणि सात सदस्य पदांसाठी दुरंगी लढती होत असल्याने निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे दिसून येत आहे. सुदवडी ग्रामपंचायत सरपंचपद सर्वसाधारण तर सदस्य अनु.जाती १, ओ.बी.सी.महिला १, सर्वसाधारण महिला ३ व सर्वसाधारण २ असे आरक्षण पडले आहे. उमेदवारांनी प्रचारास सुरुवात देखील केली आहे.
सरपंचपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते अखेरच्या क्षणी पाच जणांनी माघार घेतल्याने रिंगणात दोघेच राहिले आहेत. तर प्रभागात ३ जागांसाठी ७ अर्ज दाखल होऊन एकाने माघार घेतल्याने ६ उमेदवार रिंगणात राहिले असून एकास एक अशी लढत होईल. प्रभागा २ मध्ये २ जागांसाठी ८ अर्ज दाखल होऊन ४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे, दुरंगी लढत होत आहे. तर प्रभाग ३ मध्ये ६ पैकी दोघांनी माघार घेतल्याने २ जागांसाठी ४ जणांत दुरंगी सामना होत आहे.
प्रभागनिहाय उमेदवार :- सरपंच (सर्वसाधारण) अक्षय हनुमंत मोईकर व सुमीत शिवाजी कराळे, वार्ड १- (अनु.जाती) आकाश गोतारणे व प्रमोद शिंदे, (ना.मा.प्र.महिला) प्रतिक्षा वाळूंजकर व सारिका वाळूंजकर, (सर्वसाधारण महिला) सायली कराळे व छाया टिळेकर, प्रभाग २ (सर्वसाधारण) उमेश शिंदे व गुलाब कराळे, (सर्वसाधारण महिला) वैशाली शिंदे व विद्या मोईकर, प्रभाग ३ – (सर्वसाधारण) सूरज मोईकर व वैभव गाडे, (सर्वसाधारण महिला) प्रिती शिंदे व अक्षदा शेंडे.