न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२३) :- सोमाटणे येथे नवीन पोलिस चौकी सुरू झाली आहे. त्यामुळे अवैध धंद्यांना आळा बसणार असून नागरिकांना सुरक्षा मिळणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने सोमाटणे येथे स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी करण्यात आली होती.
उपसरपंच नितीन मुऱ्हे, संतोष मुऱ्हे, विष्णू मुऱ्हे, माजी सरपंच विशाल मुऱ्हे, राकेश मुऱ्हे, शेखर मुऱ्हे आदींनी पोलिस चौकीची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या तळेगाव पोलिस ठाणे अंतर्गत सोमाटणे येथे नवीन पोलिस चौकी सुरू करण्यात आली. या पोलिस चौकीत पूर्ण वेळ कर्मचारी राहणार असल्यामुळे या परिसरातील सर्व अवैध धंद्यांना आळा बसणार आहे.