न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२३) :- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. मराठा आरक्षणाची मागणी तशी जुनीच आहे. मराठा समाजाने गेली अनेक वर्ष आंदोलनं केली, मोर्चे काढले, आमरण उपोषण केली. तरही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. आज याचेच रौद्ररुप राज्यात पाहायला मिळत आहे. राज्यात जाळपोळ व नुकसान करुन कोणताही प्रश्न मार्गी लागत नाही. शांततेच्या मार्गच योग्य आहे.
मनोज जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गातून सुरु केलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून समस्त सकल मराठा समाज पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ नागरिक यांच्याकडून बुधवारी (दि. १) रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पी.के. चौक पिंपळे सौदागर येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे.
पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ व नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त सकल मराठा समाज पिंपळे सौदागर यांच्या वतीने करण्यात आले आहे.














