न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०१ नोव्हेंबर २०२३) :- मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले होते. आताही गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे आठ दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. या निष्क्रीय अकार्यक्षम सरकारचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या गुरुवारी (दि. २) रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा सकाळी अकरा वाजता खंडोबा मंदीर चौक, आकुर्डी येथून तहसलिदार कार्यालय निगडी असा निघणार आहे.
या मोर्चा आयोजनासाठी झालेल्या बैठकीस प्रकाश जाधव, मारुती भापकर, सतिश काळे, नकुल भोईर, धनाजी येळकर पाटील, राजन नायर, मीरा कदम, सुनिता शिंदे, कल्पना गिड्डे, अभिषेक म्हसे, गणेश सरकटे, दादासाहेब पाटील, अंगद जाधव, संजय जाधव, नानासाहेब वारे, पांडुरंग प्रचंडराव, वैभव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.


















