न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. ०३ नोव्हेंबर २०२३) :- देशात सर्वाधिक आणि विविध प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्ण आढळून येतात. मात्र वेळीच निदान व उपचाराअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. लक्षणे आढळल्यास वेळीच तपासणी केल्यास रुग्णाचा जीव वाचविता येतो तसेच सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास तो बरा देखील होतो.
राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनानिमित्त मोफत कर्करोग निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव येथील टिजीएच ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी टिजीएच ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये सीबीसी, एफएनएसी, मॅमोग्राफी, पॅप स्मिअर, मौखिक कर्करोग तपासणी सारख्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आणि नाव नोंदणीसाठी 8128123067, 7030362222 यावर संपर्क साधण्याचे आवाहन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.