- दिवाळीच्या तोंडावर फ्लॅटच्या किमती वाढविण्यावर नजर?..
- आयटी पार्कसाठी कचरा डेपोची सर्वात मोठी समस्या..
- पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या छाया सोळंके-जगदाळे यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ नोव्हेंबर २०२३) :- नुकताच मोशी-चह्रोलीमध्येसुध्दा आयटी पार्क उभा राहु शकते, असा अंदाज काही राजकीय वर्गाकडून वर्तवून त्याला जर-तरच्या मुद्द्याचा आधार घेऊन आयटी पार्कचे गाजर दाखवले जात आहे. यामाध्ये दिवाळीच्या तोंडावर फ्लॅटचे दर चढ्या भावाने वाढवून विक्रीच्या फंड्याला हावा दिली जात आहे. पण वास्तविक सोयी साधणांचा विचार केला तर या ठिकाणी आयटी पार्कची शक्यता आतातरी दुरदूरवर दिसत नाही. पण त्यांच्या या दाव्यामुळे मात्र शहरातील गरीब कष्टकरी वर्गातील स्वप्नातील घरे मात्र अजून महाग होऊन त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली आहे. यामुळे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे. या स्वप्नापासून त्यांना वंचित ठेवण्याचे हे पाप कोण करत आहे हे देखील आता मतदारांना चांगलेच कळाले आहे.
च-होली मोशीमध्ये सध्या अनेक नामवंत संस्थेचे मोठ-मोठे गृहप्रकल्प सुरु आहेत. यामध्ये अनेक राजकीय वर्गाची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झालेली असून, या प्रकल्पांना म्हणावा तसा अद्यापही ग्राहकाकडून खरेदीसाठी प्रतिसाद मिळत नाही. यामुळे आयटी पार्कचे गाजर दाखवून या ठिकाणी असलेल्या हजारो फ्लॅटची विक्री दिवाळीच्या तोंडावर चढ्या भावाने व्हावी, हा खरा उद्देश या विषयाला हावा देण्यामागील असल्याचा आरोप पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या संस्थापक अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी केला आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरीकांचे लक्ष या परिसरावर खिळवण्यासाठी काही राजकीय गुंतवणुकदार वर्गाकडून मतदारांची व नागरीकांची दिशाभुल करुन आपली स्वत:ची आर्थिक हिताची पोळी भाजण्याचे काम जाणीव पुर्वक केले जात आहे, हा देखील उद्देश आता मतदारापासून लपुन राहिला नसल्याचेही सोळंके-जगदाळे यांनी सांगितले.
मोशी-च-होली मध्ये वाहुतूकीची जीवघेणी समस्याः-
या परिसरातील नागरीक वाहतुकीच्या समस्यामुळे मेटकूटीस आले असून त्यांना दिवसा घराच्या बाहेर पडणे मुश्लिकच नाही तर जीवघेणे झाले आहे. या बरोबरच या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या असून राजकीय वरदह्स्ताने टॅंकर माफीयांनी येथील अनेक सोसायटींना कंगाल केले आहे. या बरोबरच आता विवीध कारणामुळे प्रदुषणामध्येही येथे कमालीची भर पडली आहे. यामुळे येथे राहत असलेले लाखो नागरीक एखाद्या कोंडवाड्यात राहिल्याप्रमाणे राहत असल्याचे येथील रहीवाशी सतत बोलून दाखवत असतात. तसेच येथील अनेक अडचणी अजूनही प्रलंबित असताना आयटी पार्क कसा होईल व झाल्यावर येथील वाहतुकीची जी उग्र समस्या निर्माण होईल त्याला जबाबदार कोण असेल?
तळवडे आयटी पार्क बंद असल्यासारखाच?…
कोरोनाच्या जागतिक माहामारीत अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा अवलंब करत पार्कमधील आपले अनेक कार्यालय बंद केली तर काही बंद झाली. याप्रमाणेच चिखली-मोशी जवळील तळवडे येथील अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळत काम बंद केले आहे. यामुळे तळवडेसारखा आयटी पार्क ओस पडला आहे की काय? असा सवाल नागरिक करीत आहेत. चिखली-मोशी-च-होली येथील नागरीकांना प्राथमिक गरजांसाठी अजूनही झगडावे लागत असताना, त्या समस्या पुर्ण करण्याएवजी आणखी समस्यांत भर टाकणे हे कितपत योग्य आहे.
आयटी पार्क उभे राहात असल्याचा आनंदच आहे, पण….
दिवाळीमध्ये नागरीक मोठ्या प्रमाणात विवीध वस्तुंची खरेदी करत असतात. यामध्ये घरांचा देखील समावेश असतो. महागाईमुळे अधिच नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे निटनिटकी दिवाळी देखील साजरी करता येत नाही. काहींनी घर विकत घेण्यासाठी पोटाला चिमटे काडून पै ना पै जमवलेली आहे. पण घराच्या किमंती पाहता त्यांना घर घेता येत नाही. शहरात काही प्रमाणात चिखली-मोशी-चर्होली या ठिकाणी नागरीकांना परवडणारी घरे आहेत. पण या आयटी पार्कच्या जुमल्यामुळे बिल्डर लॉबीनी या घरांच्या किमतीसुध्दा वाढवल्या आहेत. यामुळे अऩेक महिलांचे आपल्या स्वत:च्या घराचे स्वप्न अपुर्णच राहणार आहे. दिवाळी संपल्यानंतर या बिल्डर लॉबींची घरे विकल्यानंतर आयटी पार्कचे दाखवलेले गाजर सर्वांनाच शोधायची वेळ येईल. याला जबाबदार कोण असेल.
छाया सोळंके-जगदाळे – अध्यक्षा, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी…














