- स्वामी प्रतिष्ठानकडून पोलीस आणि सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२३) :- दिवाळीनिमित्त स्वामी प्रतिष्ठानच्या वतीने निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे आज शनिवारी (दि. ११) रोजी पोलीस बांधव आणि साफसफाई कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस नंदकुमार डेरे, कार्यकर्ते अभिराज कावुर, सागर कस्पटे, अभिषेक शेट्टी, अमोल भोंडवे, आनंद यरगोळे, अभिजित काचोळे, सुजित नाणेकर, अक्षय बागल, पोलीस बांधव आणि सर्व सफाई, गटार, रस्ते सफाई कामगार व रोज कचरा गाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष तेजस नंदकुमार डेरे म्हणाले, कर्तव्यदक्ष पोलीस बांधव आपल्या जीवाची बाजू लावून नागरिकांचे रक्षण करतात तर, रोज आपल्या घरातील कचरा गोळा करणे व रस्ते साफसफाईचे काम नियमित चालू ठेवून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे सर्व सफाई कर्मचारी व पोलीस बांधव हे आपले रियल हिरो आहेत. त्यांचा पण सन्मान होणे गरजेचे आहे, ही विचारधारा घेऊन स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

















