न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- देहूतील बाह्यवळण मार्गावर रात्रीच्या वेळी वाहन चालकांना धमकावून त्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, या मार्गासह परिसरातही पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देहूत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याने, वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होत आहे. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी प्रकाश व्यवस्था नसल्याने तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने वाहनचालकांना धमकावून लुटण्याच्या घटना घडतात.
काही मद्यपीही या मार्गावर सुसाट गाड्या चालवत असतात. कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांबाबत असे प्रकार अनेकदा घडले आहे. या मार्गावर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.