- युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव यांचे चिमुकल्यांना ‘गिफ्ट’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२३) :- आधुनिक भारताचे प्रणेते, देशाचे पहिले पंतप्रधान आणि लहान मुलांचे आवडते ‘चाचा नेहरू’ अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणूनही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील बालगोपाळांना ‘सायन्स पार्क’ भेटीचे अनमोल गिफ्ट दिले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस वसीम शेख, जिफिन जॉन्सन, विक्रांत सानप, मयूर रोकडे, व इतर युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील सुमारे १३० विद्यार्थ्यांनी या सायन्स पार्क सफारीचा आनंद लुटला. सायन्स पार्कमधील तारांगण प्रणालीचा विशेष अनुभव यावेळी या बालचमुनीं अनुभवला. यामध्ये आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, ग्रह, तारे, नक्षत्र, ग्रहण आदींविषयी 3 डी डिजिटल तारांगण प्रणाली असलेल्या हायब्रीड कॉन्फिग्रेशन सिस्टिमद्वारे प्रत्यक्ष अनुभवले.
या उपक्रमाबाबत बोलताना आयोजक प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव म्हणाले की, देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले होते. वैज्ञानिक खेळण्यांच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी त्यांच्या कलागुणांना आणखी वाव निर्माण होऊन ते समृद्ध करण्यासाठी व आतापासूनच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, हा आमचा प्रमुख उद्देश होता. आणि बालचमुंच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचा उद्देश सफल झाला असल्याची भावना, चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केली.













