न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १७ नोव्हेंबर २०२३) :- न्यायालयाचे कामकाज डिजिटल करण्यासाठी पक्षकार, वकील यांनी ऑनलाईन माध्यमातून खटले दाखल करण्याची (ई फायलिंग) सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ई फायलिंग सेवेचे वडगाव मावळ जिल्हा व सत्र न्यायालयात उद्घाटन झाले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा, एआयआर व्हिजन इन्फीनिटी प्राव्हेट लिमिटेड आणि वडगाव मावळ बार असोसिएशन संचलित ई-फायलिंग व सुविधा केंद्र प्रदान समारंभ नुकताच जिल्हा व सत्र न्यायाधीश गांधी यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमासाठी दिवाणी न्यायाधीश उमरेडकर, दिवाणी न्यायाधीश चव्हाण, दिवाणी न्यायाधीश बर्गे, दिवाणी न्यायाधीश अगरवाल, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर, वडगाव मावळ बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. संजय वांद्रे, उपाध्यक्ष अॅड. चंद्रकांत खांदवे, सचिव अॅड. देविदास मराठे, अॅड. सुचेता आंबिकर, खजिनदार अॅड. रुपाली सातकर, सदस्य अॅड. रवींद्र विनोदे, अॅड. समीर खांदवे, अॅड. अरविंद गोतारने, अॅड. मृणाल टिळेकर-भुजबळ, अॅड. सुरेखा ढोरे-जोरी, अॅड. अमृता पवार, अॅड. अपूर्वा गिरमे, अॅड. जयश्री शितोळे, ॲड. हेमंत वाडेकर, अॅड. महेंद्र खांदवे, अॅड. शैलेश पडवळ, अॅड. पवन भंडारी तसेच वडगाव बार असोसिएशनचे जेष्ठ वकील बंधु भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश गांधी म्हणाले की, इ-फायलिंगमुळे न्यायालय पेपर लेस होण्यास मदत होईल. तसेच कागदपत्रे गहाळ होणे बंद होईल. न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार असून यामुळे पक्षकारांचे पैसे व वेळ यांची बचत होणार आहे.
कार्यक्रमाच्या वेळी दिवाळी फराळाचेही आयोजन वडगाव मावळ वकील बार असोसिएशनने केले होते. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर यांनी उपस्थित युवा वकिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.