- छठपूजेचा सण थोरा-मोठ्यांचा आदर करायला शिकवतो – डॉ. कुंदाताई भिसे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२३) :- पिंपळे सौदागर येथील महादेव घाटावर उत्तर भारतीयांचा छठपूजा उत्सव सोमवारी (दि. २०) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय कुटुंबांनी भक्तिभावाने सुर्योपासना केली. या धार्मिक कार्यक्रमात उन्नती सोशल फाउंडेशन तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी उत्तर भारतीय महिलांसोबत छठपूजा उत्सव साजरा केला. तसेच त्यांना शुभेच्छादेखील व्यक्त केल्या.
यावेळी उद्योजक संजय भिसे, मा. नगरसेविका निर्मला कुटे, संकेत कुटे, विकास काटे, शेखर काटे, विलास काटे, दादाभाऊ इंदोरीकर, उत्तम धनवटे, मल्हारी कुटे, भरत काटे, दत्ता काटे, सुरेश कुंजीर, शंकर चोंधे, बाळासाहेब भुंडे आणि परिसरातील उत्तर भारतीय महिला आणि बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
डॉ. कुंदाताई म्हणाल्या, दरवर्षीप्रमाणे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला छठ पूजा साजरी केली जाते. विशेषत: बिहार, यूपी, झारखंडमध्ये हा सण साजरा करण्याचे विशेष महत्त्व आहे. आज अखेरच्या म्हणजेच चौथ्या दिवशी कार्तिक शुक्ल सप्तमीला सर्व महिला पहाटे पूजेचे सर्व साहित्य घेऊन घाटावर आल्या होत्या. त्यांनी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले. पाण्यात उभे राहून सूर्यदेव बाहेर येण्याची पूर्ण भक्तिभावाने वाट पहिली. सूर्योदय झाल्यावर छठ मैयाचा जप करून सूर्याला अर्घ्य दिले. शेवटी दूध पिऊन व प्रसाद खाऊन उपवास पूर्ण सोडला. छठपूजेचे व्रत कठीण असले तरी स्त्री-पुरुष हे व्रत भक्ती-भावाने करतात. हा सण मोठ्यांचा आदर करायला शिकवतो.