न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाचे सहायक आयुक्त विनोद जळक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तसेच, प्रशासन अधिकारी म्हणून क क्षेत्रीय कार्यालयाचे दशरथ कांबळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. तर, ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे यांची कर संकलन विभागात प्रशासन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच काढले आहेत.












