न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२३) :- पिरंगुट घाटामध्ये टेम्पोने सहा वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात रविवारी दुपारी एकच्या सुमारास झाला. भरधाव वेगात असणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचे तीव्र उतारावर गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टेम्पोने इतर वाहनांना उडवले. विटांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोने पाच दुचाकी आणि एका कारला धडक दिली. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला.