न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ नोव्हेंबर २०२३) :- श्री क्षेत्र देहूच्या उपनगराध्यक्षा शीतल हगवणे यांच्यासह स्वीकृत नगरसेवक गणेश हगवणे व अक्षदा हगवणे यांनी देखील राजीनामे दिले असून ते राजीनामे मंजूरही केले आहेत.
उपनगराध्यक्षा शीतल हगवणे यांनी काही महिन्यांपूर्वीच आपला राजीनामा गटनेते योगेश परंडवाल यांच्याकडे दिला होता. मात्र, गटनेत्यांनी तो नगराध्यक्षांकडे दिला नसल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता.
अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केल्यानंतर अध्यक्षांचा राजीनामा होण्यापूर्वी नगराध्यक्षांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. मात्र, ही बाब सांगण्यास संबंधितांनी टाळाटाळ केली होती.