न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२३) :- सुदुंबरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयवंत तुकाराम बोरकर यांची निवड झाली आहे. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीची विशेष बैठक सरपंच मंगलताई कालिदास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी निकम, ग्रामसेविका सातिका गजशिवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीस सर्व नवनिर्वाचित सदस्य, मा. उपसरपंच राजेंद्र गाडे, जालिंदर गाडे, उद्योजक कालिदास गाडे, मा. सदस्य संजय गाडे, विजय गुंजाळ, राष्ट्रवादीचे संतोष गाडे, माणिक गाडे, नवनाथ गाडे, चेअरमन संदीप काळडोके, मा. सरपंच रामदास गाडे, मा. उपसरपंच सुरेश गाडे, मा. उपसरपंच विजय दिवेकर आदी उपस्थित होते.
या निवडीनंतर गावच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.












