न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. १३ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदार संघाचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ निगडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थितांसमोर भाषण करताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले की, भाजप-सेनेवर लोकांनी विश्वास ठेवला ही लोकांची चूक झाली.
तुम्ही लोकशाहिचे राजे आहात. लोकांना विश्वासात घेऊन भाजप-शिवसेनेने नागरिकांचा केसाने गळा कापला. पाच वर्षात देशाचं नंदनवन करता आले असते. परंतु, हे तर दलाल निघाले.
अनेक वर्षापूर्वी व्यापाराचा हेतू घेऊन, चिल्लर इंग्रजांची इस्ट इंडिया कंपनी भारतात आली. त्यांच्यावर विश्वास ठेवून, आपण गुलामगिरीत गेलो. आता पून्हा भाजपला मत देवून, गुलामगिरीत जावू नका, असे आवाहन खा. उदयनराजे यांनी मतदारांना यावेळी केले.











