न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विदयमाने काळेवाडी येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर (माजी विरोधी पक्षनेते, पिं. चिं. मनपा) यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम शेळके मामा (सामाजिक कार्यकर्ते) होते. यावेळी अनिताताई तापकीर (माजी नगरसेविका मनपा), संस्थेचे सचिव सागर तापकीर, युवा नेते सोमनाथ तापकीर, संस्थेचे संचालक राजूशेठ पवार, मा. कय्युम शेख, भुजबळ साहेब, देवराम थोरात, अर्जुन दाखले, दत्ता पवार, शिंदे दादा, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाषणे व पोवाडे सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बापू बल्लाळ सर यांनी केले. तर देव सर यांनी आभार मानले.











