- पवार साहेबांच्या वाढदिवसाचे नियोजन; पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाची चिंचवडगाव येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे आणि शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली. पुढील महिन्यातील पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यात आले. शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल आहेर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कैफ तांबोळी यांची पिंपरी विधानसभा संघटकपदी, बालाजी जाधव यांची चिंचवड विधानसभा उपाध्यक्षपदी, गणेश उंडाळकर बालाजी लॉ कॉलेज अध्यक्ष, समर्थ शेळके यांची चिंचवड विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.
बैठकीस अक्षय शेडगे, वैष्णवी पवार, ऋषभ भडाळे, तुषार गाडे, चैतन्य बनकर, ऋतिक गायकवाड, ऋषिकेश सत्रे, अभिषेक कांबळे, अनुष्का काळभोर, प्रतीक्षा पठारे, अंकिता नाटेकर, सिद्धी माळी, विश्वा लोंढे, ज्ञानेश्वर वाघमारे, हर्षद परमार, ज्ञानेश्वर पुदाळे आदी उपस्थित होते.














