न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२३) :- निगडीतील सेक्टर २२ येथील दळवीनगरमधील पत्राशेड परिसरात रविवारी पहाटे भंगारच्या दुकानाला आग लागली होती. यामध्ये दोन घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दल वेळेवर उपस्थित झाल्यामुळे आग आटोक्यात आली. पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.














