न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २७ नोव्हेंबर २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील सरकारी गायरान जागा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयास देवू नये, या मागणीसाठी देहू ग्रामस्थांच्या वतीने उद्या मंगळवारी (दि. २८) रोजी उपोषण करण्यात येणार आहे.
देहू येथे सुमारे दिडशे एकर सरकारी जागा आहे. यापैकी पन्नास एकर जागा पोलिस आयुक्त कार्यालयास देण्यात येणार आहे. यासाठी सरकार पातळीवर हालचाली सुरू आहेत. या निर्णयाला नागरिक विरोध करत आहेत.
हद्द निश्चित करण्यासाठी आलेल्या मोजणी अधिकारी यांना नागरिकांकडून विरोध करण्यात आला. या जागेचा उपयोग देहूच्या विविध उपक्रमांसाठी करण्यात यावा त्यामध्ये पालखी तळ, नगर पंचायत कार्यालय इमारत, क्रीडापण, वाहनतळ व इतर योजना राबवल्या जाणार आहेत. त्यामुळे जागा देऊ नये अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्यासाठी उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकाश काळोखे, योगेश काळोखे, योगेश परंडवाल, प्रवीण काळोखे यांनी दिली.