- लाखोंचे मोबाईल जप्त; वाकड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२३) :- फ्लिपकार्टच्या हबमधुन मोबाईल चोरी करणा-या दोन डिलीव्हरी बॉयला वाकड पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकुण ५,९१,२४४ रुपये किंमतीचे २४ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा.लि., काळेवाडी या फ्लिपकार्टच्या हबमधील मॅनेजरच्या तक्रारीवरुन हबमधील कामगार यांनी एकुण ९,४७,१६० रुपये कि.चे विविध कंपनीचे एकुण ३८ मोबाईल चोरीस गेल्याबाबत वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. १११३/२०२३ भा.द.वि.कलम ३८१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसरा व दिवाळीच्या पूर्वी फ्लिपकार्टमध्ये ‘बिग बिलीयन डे’ हा सेल असतो. त्या काळात ग्राहकांची खरेदी प्रमाणे वाढलेले असते, त्यामुळे फ्लिपकार्टच्या हबमध्ये मोठया प्रमाणात वस्तूंची आवक-जावक असते, त्याच काळात हबमध्ये काम करणा-या कामगांरापैकी काही कामगांरानी वाढलेल्या कामाचा लोडचा फायदा घेत गुन्हा केला असण्याचे निष्पन्न झाले. तपासात सुरवातीला डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणारा आशिष भाऊसाहेब भोसले (वय २२ वर्ष, रा. रमाबाई नगर, पिंपरी लिंकरोड, दावत राईस शेजारी, सिमला हॉटेलजवळ, पिंपरी) याला व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. एकुण ०८ मोबाईल फोन मिळाले. सदर आरोपीची पोलीस कस्टडी प्राप्त करून तपास केला असता, पियुष गोविंद मोहिते (वय २३ वर्षे, रा. नमो सृष्टी अपार्टमेंट रुम नं. बी / ३०१, गणेश इंटरनॅशनल स्कुल शेजारी, नेवाळे वस्ती, चिखली) याचे नाव निष्पन्न झाल्याने त्यास अटक करुन कौशल्यपूर्ण तपास केला. तपासात सर्व आरोपींकडून एकुण ५,९१,२४४ रुपये किमतीचे विविध कंपनीचे २४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याचा उर्वरित मोबाईल तपास सुरु आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त, परि-२, डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफौ. विभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा, अतिश जाधव, पोहवा प्रमोद कदम, पोहवा.बंदु गिरे, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. अतिक शेख, पोना विक्रांत चव्हाण, पोना. राम तळपे, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. सौदागर लामतुरे, पोशि. कौंतेय खराडे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि.सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.