न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये तेविस वर्षांपासून माध्यम क्षेत्रात जाहिरात सेवा देणाऱ्या आकार ॲड्सचा शनिवारी (दि. १३) रोजी तेविसावा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
आकार ॲड्सचे संचालक तुषार गंधे व संस्थापक विलास गंधे यांना अर्थ, उद्योग, शेती, व्यापार, प्रशासन, माध्यम, शिक्षण, कला, क्रिडा, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
आकार ॲड्स ही संस्था मागील तेविस वर्षांपासून विविध वृत्तपत्रांना, दूरचित्रवाहिन्यांना व रेडिओ, एफएम संस्थांना जाहिरात सेवा देण्यामध्ये अग्रेसर आहे.











