- डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेली देशाची राज्यघटना सर्व जनतेसाठी सर्वात मोठी देणगी – खा. बारणे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त बारणे यांनी अभिवादन केले.
यावेळी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, हरेश नखाते, प्रदीप दळवी, प्रमोद ताम्हणकर, अंकुश कोळेकर, भरत जाधव, हनुमंत पिसाळ, हनुमंत सुतार, गणेश वायबल, राजू खांदवे, भाग्यश्री म्हस्के, उज्ज्वला पांढरे, कल्पना काकुर्डे आदी उपस्थित होते.
आज रविवार (दि. १४) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून, त्यांचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जात आहेत. त्यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना ही सर्व जनतेसाठी सर्वात मोठी देणगी आहे. त्यांचे विचार सर्वत्र आणखी सक्रियपणे पसरविण्याची गरज आहे, असे यावेळी बारणे यांनी सांगितले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांशी खासदार बारणे यांनी चर्चा केली. आंबेडकर यांनी जनतेला दिलेला मतदानाचा अधिकार सर्वांनी बजावला पाहिजे, असे आवाहन देखील बारणे यांनी केले.











