- आढळराव यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा केला संकल्प
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आंबेगाव (दि. १४. एप्रिल. २०१९) :- भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज रविवार (दि. १४) रोजी प्रचार दौऱ्यानिमित्त पेठ, आंबेगाव या ठिकाणी भेट दिली.
पेठ ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात आढळराव यांचे स्वागत केले. आढळराव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून, तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, कल्पनाताई आढळराव पाटील, भाजपा संपर्कप्रमुख जयसिंगशेठ एरंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुणभाऊ गिरे, मा. उपसभापती राजुशेठ जवळेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखेले, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, भाजपा तालुका अध्यक्ष संजय थोरात, युवासेना विस्तारक सचिन बांगर, जि. प. सदस्य देविदास दरेकर, शिवसेना नेते सुरेशभाऊ भोर, पंचायत समिती सदस्य शीतलताई दोडके, भाजपा युवानेते डॉ. ताराचंद कराळे, उद्द्योजक लक्ष्मणराव काचोळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष हेमलता मोरे, दिलीपराव पवळे, अशोक बाजारे तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व पेठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











