न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वभुषण, हिंदू कोड बिलाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ व कै. श्री भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, तापकीरनगर, काळेवाडी यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यमान खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रेरणागीते सादर करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर, विमलसन्स उद्योग समूहाचे उमेश शिंदे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, हरेश नखाते, ओझोन टेक सोलुशनचे प्रवीण थिटे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, प्रसाद गुप्ते, संतोष जाधव व आदी कार्यकर्ते व साई मल्हार सोशल फाऊंनडेशनचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका श्रीमती उल्का जगदाळे, प्रशांत भोसले, नवनाथ तापकीर, रविंद्र बामगुडे यांनी केले. उपस्थित मान्यवराचे स्वागत संस्था संचालक शशिकांत तापकीर यांनी केले तर आभार प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी मानले.











