न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२३) :- देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास आणि केलेला विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र आहे. मोदींवर सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवून दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपाचे ४५ हून अधिक खासदार आणि देशातील ३५० हून अधिक खासदार निवडून येतील. विजयाची ही मालिका कायम राहील, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यामध्ये झालेली निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपाचे दमदार कामगिरी करीत बहुमत मिळवले आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यलयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष जगताप बोलत होते.
यावेळी, भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडिगेरी, संजय मगोडेकर, अजय पाताडे, नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे,युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, प्रदेश सचिव कविता हिंगे, उपाध्यक्ष आशा काळे, सचिव राजश्री रायभाय, अभिजित बोरसे, समीर जावळकर, उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस धनराज बिरदा, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाड्ये, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, गोपाळ मंडल, जयेश चौधरी, सुधीर साळुंखे, प्रसाद कस्पटे, वीणा सोनवलकर, दीपक भंडारी, राजन गुंजाळ, खेमराज काळे, गणेश ढाकणे, चैतन्य देशपांडे, बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ठच्या प्रीती कामतिकर, माजी नगरसेविका अश्विनी बोबडे, सदस्या सुनीता खराडे, प्रज्ञा हीतनाळेकर, सीमा चव्हाण, संतोष भालेराव आदी उपस्थित होते.














