- काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच देशातील वंचित समाजघटकला सन्मानाने जगण्याचा न्याय्य हक्क मिळाला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना संविधानाने एकसमान हक्क मिळवून दिले आहेत. त्यामुळेच देशातील वंचित समजाला शिक्षण, राजकीय, नोकरीत आरक्षण व संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग सचिव मनोज बागडी यांच्या हस्ते पिंपरी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष श्यामलाताई सोनावणे, शहर महिला अध्यक्ष गिरीजा कुदळे, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश कार्याद्यक्ष गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, मकरध्वज यादव, शहाबुद्दीन शेख, राजन नायर, किशोर कळसकर, बाबा बनसोडे, सुंदर कांबळे, हुरबानो शेख, अमर नाणेकर, विजय ओव्हाळ, विशाल कसबे, वसीम शेख, कुंदन कसबे, नितीन पाटेकर, तुषार पाटील, मोहन अडसूळ, नंदा तुळसे, अर्जुन खंडाळे, दिलीप पांढरकर आदी उपस्थित होते.











