न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १४. एप्रिल. २०१९) :- स्वि. नगरसेवक संतोष मोरे यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. वाढदिवस आहे, म्हणून तो विविध झगमगाटात साजरा न करता, त्यांनी वाढदिवसाचा खर्च विधायक कामांवर खर्च केला आहे.

रविवार (दि. १४) रोजी त्यांनी चिखली येथे अनाथ आश्रमांना भेटी दिल्या. चिखलीतील विकास अनाथ आश्रम येथे त्यांनी अनाथ मुलांना अन्नदान वाटप केले. चंद्रभागा गोशाळा, चिखली येथे गोमातेस चारा वाटप केला.
यावेळी स्वी. नगरसेवक दिनेश यादव, चिखली गावातील युवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक क्रिडा मित्र मंडळ यांनी केले होते.











