न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- जीतो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) पिंपरी चिंचवड संघटनेच्या नवीन कार्यकारणीचा शपथविधी कार्यक्रम नुकताच पार पडला. ‘जीतो’ च्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी संतोष धोका यांची निवड करण्यात आली.
संघटनेचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जीतो पिंपरी चिंचवड संघटनेत अध्यक्ष संतोष धोका, उपाध्यक्ष दिलीप सोनिगरा, नितीन बेदमुथा, प्रकाश गादिया, महेंद्र गंगवाल, सरचिटणीस नेमीचंद ठोळे, सचिव मनीष ओसवाल, आंनद जैन, खजिनदार पंकज सुराणा, नवनीतलाल बोरा, अमन जैन.

महिला संघटनेत तृप्ती कर्नावट, अर्चना चोरडिया व युथ कार्यकारणीत दीपेश बाफना, रोनक जैन, यश फिरोदीया, मयूर सोळंकी, गौरव कोठारी, रोहन जैन, अभिषेक मुथा, चिराग चोरडीया,विराज भंडारी, प्रेक्षा लुंकड, उन्नती खिंवसरा, प्रणिता खाबिया यांची निवड झाली. संघटनेच्या इतर विविध पदांवर राजेंद्र मुथा, तुषार लुणावत, शीतल खिवंसरा, आनंद मुथा, दिलीप नहार, प्रा. अशोक पगारिया, अशोक बागमार, पराग कुंकुलोळ, संकेत जैन यांची निवड करण्यात आली. ही कार्यकारणी दोन वर्षांसाठी कार्यरत राहणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले.
यावेळी जीतो चे मुंबई संचालक विजय भंडारी, राजेश सांकला, महिला अध्यक्ष शर्मिला ओसवाल, कांतीलाल ओसवाल, अजीत सेठिया, इंद्रकुमार छाजेड, रमेश गांधी, विजय जीरावाला आदी उपस्थित होते.











