न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४. एप्रिल. २०१९) :- राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किरण मोटे आणि विनायक रणसुभे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेनेसाठी हा धक्का मानण्यात येत आहे.
शिवसेनेत घुसमट होत असल्याने जय महाराष्ट्र केला, अशी प्रतिक्रिया विनायक रणसुभे यांनी दिली आहे. विनायक रणसुभे आणि किरण मोटे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
किरण मोटे हे २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. शिवसेनेकडून त्यांना पिंपरी विधानसभेच्या उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु, शिवसेनेतच विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी पाहता, त्यांनी आपलाच गाव बरा गड्या… या भावनेतून घरवापसी केली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.











