न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२३) :- आधारकार्डमध्ये बदल करण्यास अधिकृत व्यक्ती नसल्याचे माहीत असतानासुध्दा दोघांनी अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र चालक असल्याचे लोकांना भासवले. लोकांची बनावट कागदपत्रे तयार करुन आधारकार्डमध्ये तसेच इतर शासकीय कागपत्रांमध्ये आरोपींनी कामगारांच्या मदतीने अनधिकृतपणे बदल करुन शासनाची फसवणुक करीत असल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले.
हा प्रकार मागील सुमारे दोन ते तीन वर्षापासुन ते (दि. ६) पर्यंत कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी, पुणे नाशिक हायवे लगत भोसरी येथे घडला.
याप्रकरणी विशेष शाखेचे पोलीस उप निरीक्षक शामवीर नामदेव गायकवाड यांनी आरोपी १) शिवराज प्रकाश चांभारे (कांबळे), २) महीला आरोपी, ३) धोंडीबा प्रकाश शेवाळकर, ४) गणेश रामदास यंगड यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात ९८३/२०२३, भा.द.वि. कलम ४२०,४६५, ४६८,४७१,४७३,३४ व आधार कायदा २०१६ चे कलम ३६ व ४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.












