- नवदुर्गा सखी मंचच्या रुपालीताई पांडुरंग सानेंचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ नोव्हेंबर २०२३) :- लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपाली पांडुरंग साने यांच्यावतीने हभप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. कै. गजानन म्हेत्रे उद्यान, म्हेत्रेवस्ती येथे कीर्तन सोहळा पार पडला.
यावेळी यावेळी भाजपाचे कार्तिक लांडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपाली पांडुरंग साने, युवा नेते पांडाभाऊ साने, कुसुम नागरगोजे, भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी, तसेच चिखली परिसरातील संप्रदायिक मंडळी, राजकीय सामाजिक, क्षेत्रातील मंडळी आणि चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती आदी परिसरातील नागरिकांनी कीर्तन श्रवणाकरिता गर्दी केली होती.
या वेळी हभप इंदोरीकर महाराजांनी स्व. मुंडे साहेबांच्या कार्याची महिमा श्रोत्यांना सांगितली. तसेच आमदारदादांच्या सर्वच कामाची स्तुती करून अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर, आई-वडिलांची सेवा करा, घर गृहस्ती नीट ठेवा, पौष्टिक आहार घ्या, तरुणांनी शरीर,पैसा, अंगातील ताकद जपून वापरा, धर्माचे रक्षण करा, व्यसनापासून दूर राहून कुटुंबाला सांभाळा. याविषयी श्रोत्यांना मार्गदर्शन केले, अशी माहिती आयोजक रुपाली पांडुरंग साने यांनी दिली.













