न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ डिसेंबर २०२३) :- ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी बँक अकाउंट बनवणारी आंतरराज्य टोळी “गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड” कडुन अटक करण्यात आली असून ऑनलाईन फ्रॉडचे १७ गुन्हे उघड करून ९५ बनावट बँक अकाउंट उघडल्याचे निष्पन्न झाले आहे. ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देशभरात वारंवार घडत असल्याने व त्यात लोकांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणुक होत असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्याबाबत गंभीर दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस करण्याबाबत पोलिसांना आदेशित केले होते.
(दि. १५/१०/२०२३) रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात एका महिला फिर्यादी यांनी तक्रार दिली होती. त्यांची मोबाईल क्रमांकधारक याने व्हॉट्सअप मॅसेजव्दारे व टेलिग्राम आयडीवरुन गुगल मॅपवर वेगवेगळ्या हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना रिव्हु व रेटींग देणेचा जॉब असल्याचे सांगुन वेगवेगळे टास्क देवुन ते पोर्टलवर पुर्ण करण्यास सांगुन ७१,८२,५२० रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली होती. पोलिसांनी फिर्यादी यांनी ज्या विविध बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले. त्या बँक अकाउंटबाबत माहिती घेतली. यातील आरोपींचा शोध घेतला. एकुण १४ आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी यामध्ये तीनस्तरीय पध्दतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजु व्यक्ती यांचा शोध घेवून त्यांच्या नावे वेगवेगळ्या खाजगी बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते. दुसऱ्या स्तरावर आरोपी हे पहिल्या स्तरावर तयार केलेले बैंक अकऊंट व किट चेकबुक व इंटरनेट बँकीग विकत घेत होते. तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे ऑनलाईन टास्क देवुन त्याचा मोबदला देण्याचे पैशाचे आमिष दाखवुन पिडीतांशी व्हॉटसअॅप व टेलिग्राफव्दारे संपर्क साधुन त्यांना आमिष दाखवून पिडीतांकडून पहिल्या स्तरावरील अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करुन घेत होते.
याबाबत पोलीस पथकांनी रात्रंदिवस मेहनत घेवुन मध्यप्रदेश राज्यातील इंदौर, रतलाम, भोपाळ, राजस्थान राज्यातील जयपुर, उदयपुर, भिलवाडा गुजरात राज्यातील वडोदरा बिहार राज्यातील पाटणा येथुन १) चिंतन शशिकांत फडके, २) ब्रजराज रामरतन वैष्णव, ३) सुंदरदास चेतनदास सिंधी, ४) राजेश भगवानदार करमानी, ५) मोहम्मद रशिद चांद मोहम्मद, ६) अभिषेक सत्यनारायण पाराशर, ७) आशिष प्रल्हादराय जाजु, ८) मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद, ९) नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी, १०) विकास सत्यनारायण पारिख, ११ ) सुरेश गोवर्धनदास सिंधी, १२) गौरव महावीर सेन, १३) ललित नवरतन मल पारिक, १४) मनिष ऋषिकेश वैष्णव या आरोपींना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.
सदर आरोपींकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता सदर आरोपी हे अतिशय नियोजन पद्धतीने देशभरातील विविध मोठया शहरामध्ये जावुन तेथे नोकरीच्या आमिषाने स्थानिक किवा त्यांचेसह आणलेल्या व्यक्तिीचे नावाने गाळा भाडयाने घेवुन, शॉपॲक्ट, उद्यम / एम.एस.एम ई सर्टीफिकेट ऑनलाईन काढुन सदर फर्मच्या नावे वेगवेगळ्या खाजगी बँकांमध्ये करंट अकाउंट उघडत असे. आरोपींकडुन निष्पन्न झालेल्या विविध अकाउंट मधुन जवळपास २०० कोटींचे फसवणुकीचे व्यवहार झाले असुन सर्व अकाउंट फ्रिज करुन त्यातील मनी ट्रेलचे विश्लेषण करुन फिर्यादींना पैसे परत मिळवुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे सतिष माने, सहा. पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सपोनि अंबरिष देशमुख, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, पोउपनि आबासाहेब किरनाळे सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोहवा/ प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि/ प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सपोनि सागर पानमंद, पोउपनि सागर पोमण, पोहवा/नागेश माळी, पोशि/ नितेश बिचेवार, पोपट हुलगे यांनी केली आहे.