न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- घर खर्चासाठी पगाराचे पैसे न दिल्याने फिर्यादीचा भाऊ आणि त्याची आरोपी पत्नी त्यांच्यात झटपट व भांडणे झाली.
त्यानंतर आरोपी महिलेने पतीला हाताने मारहाण करुन त्याच्या चेह-यावर हाताचे नखाने वरखाडे ओढुन त्याला जोरात सोफ्यावर ढकलून दिले. त्याच्या नाकाला, गळयाला, कपाळाला दुखापत झाली. नंतर आरोपीने पतीचा डयुटीचा शर्ट घेवून त्याच्या नाकावर दाबुन त्याला जिवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. रवींद्र बाबुलाल नागरे (वय 39 वर्ष) असे मयत पतीचे नाव आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी ०१.१५ च्या सुमारास भारत मातानगर, दिघी येथे घडला. फिर्यादी महिलेने आरोपी महिलेच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात ६७९/२०२३ भा.द.वि कलम ३०२ अन्वये आरोपी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि शिखरे पुढील तपास करीत आहेत.














