न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- पिंपरी चिंचवड येथील कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेचा दरवर्षीप्रमाणे या वर्षीही नवीन वर्षाच्या दिनदर्शिका (कॅलेंडरचे) प्रकाशन सोहळा कार्यक्रम रुपेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भोसरीमधील आई तुळजाभवानी मंदिरामध्ये येथे पार पडला.
कोकण खेड युवाशक्ती ही संस्था मागील पाच वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा अशा प्रकारे विविध क्षेत्रात सामाजिक दृष्टिकोनातून काम करत आहे त्यातीलच एक काम म्हणजे आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिनदर्शिका वाटपाचे कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येते. दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रमानिमित्त अठरा गाव रहिवासी संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम, कॅप्टन संजय कदम, युवक अध्यक्ष कोकण विकास महासंघ गजानन मोरे, उद्योजक कृष्णा यादव, देवघर उगवतवाडी पुणे मंडळ अध्यक्ष अनंत मोरे, कोकण भूषण नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन सुनिल शिंदे, उद्योजिका प्राजक्ता चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनिल साळुंखे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदिप कदम सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष रूपेश मोरे यांनी आलेल्या मान्यवरांचे तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी युवाशक्तीचे सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.














