न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाने चालु केलेल्या सीईआयआर या पोर्टलवर हरविलेले मोबाईल रजिस्टर करुन ब्लॉक केलेनंतर त्या मोबाईल पुन्हा वापर झाल्यास संबंधीत तक्रारदार व स्थानिक पोलीस स्टेशन यांना वापरकर्त्याची सविस्तर माहिती उपलब्ध होते. त्यानंतर संबंधित वापरकर्त्याचा शोध घेवुन हरविलेले मोबाईल जप्त करण्यात येतात.
चिंचवड पोलीस स्टेशन मार्फतीने एकुण ३० मोबाईलची माहिती प्राप्त झालेनंतर संबंधीत वापरकर्त्याकडुन एकुण ६,०७,००० रुपये किंमतीचे ३० मोबाईल जप्त करण्यात आलेले होते. सदरचे ३० मोबाईल विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ यांचे हस्ते संबंधित मुळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
हि कामगिरी विवेक पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ यांचे मार्गदर्शनाखाली विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त, चिंचवड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिंचवड पोलीस ठाणे, प्रकाश जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चिंचवड पो. स्टे. पो.ना. सचिन सोनपेटे, पोहवा भाग्यश्री जमदाडे, पोशि मोहन वरळे यांनी केलेली आहे.
तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की, तुमचा मोबाईल हरविला असल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला जावुन हरविलेल्या मोबाईलची तक्रार देवुन केंद्र शासनाचे सीईआयआर या पोर्टलवर माहिती भरुन मोबाईल ब्लॉक केलेनंतर त्याचा पुर्नवापर झाल्यास त्याची माहिती संबंधित पोलीस स्टेशन मिळताच तो मोबाईल पोलीसांकडुन जप्त केला जातो.














