न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२३) :- सावित्रीबाई फुले पुणे विदयापिठाच्या अधिपत्याखालील डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अॅड रिसर्च, महाविदयालय, नेवाळे वस्ती, चिखली येथील महाविदयालयामध्ये एम.बी.ए.च्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचे पेपर चालु आहेत. शुक्रवारी (दि. २२) रोजी एम.बी.ए.च्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राचा लिगल अस्पेक्ट बिजनेस हा पेपर होता.
परिक्षेकरीता बसलेल्या १८३ विदयार्थ्यांपैकी कोणत्यातरी विदयार्थ्याने अथवा या प्रक्रियेमध्ये परिक्षेच्या कामकाजासंदर्भात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या व्यक्तीने त्याचेकडील मोबाईलमधील वॉटसअॅपद्वारे लिगल अस्पेक्ट बिजनेस हा पेपर गैरउददेशाने प्रसारीत केलेला आहे. त्याच्या अशा गैरकृत्यामुळे प्रामाणीकपणे अभ्यास करुन परिक्षा देणा-या विदयाथ्यांचे नुकसान करुन, त्या प्रसारीत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा संबधीत इसमाने गैरफायदा घेऊन बेकायदेशीर कृत्य केलेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
प्राध्यापक सुनिल शामराव धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात चिखली पोलिसांनी ८२६/२०२३ भादवि कलम ४२० महाराष्ट्र विदयापिठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणा-या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२, कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि कुमटकर पुढील तपास करीत आहेत.











