न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२३) :- ‘जय हारी’ म्हणाल्याच्या कारणावरुन चिडुन जाऊन आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला हाताने मारहान केली. आरोपी १ याने त्याच्या डोक्यात सीमेंटची वीट मारुन त्याला जबर दुखापत केली.
हा प्रकार (दि. २५) रोजी रात्री ८:३० वा. बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी १) प्रजा घुमाळ व त्याचा अनोळखी साथीदार (दोघे रा. बिजलीनगर चिंचवड) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी ६८०/२०२३ भा.द.वि कलम ३२६,३२३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि झिंजुढे पुढील तपास करीत आहेत.













