न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- एज्युकेशनल लोन करून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या बँक खात्यामधुन आरोपीने एकुण रक्कम रूपये ८४,११४ रुपये घेतले. फिर्यादीला कोणत्याही प्रकारचे एज्युकेशनल लोन करून न देता त्यांची फसवणुक केली आहे.
हि घटना (दि. १२/०३/२०२३) दरम्यान जुना पुणे-मुंबई हायवे, देहुरोड येथे घडली. फिर्यादी मनोहर नजेसु दॉस, जॉन चिन्ना थंबी जेसु दॉस यांनी आरोपी प्रभात मिश्राच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
देहुरोड पोलिसांनी ६८६/२०२३, भादवि कलम ४०६,४२० नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि गज्जेवार पुढील तपास करीत आहेत.















