- व्यायाम शाळा हस्तांतरणाच्या कारणावरून रंगला कलगीतुरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ डिसेंबर २०२३) :- हिंजवडी ग्रामपंचायतची मासीक सभा सुरु होती. त्यावेळी अजेंडयातील मुद्दा क्र. १७ हा ग्रामपंचायत व्यायाम शाळा हस्तांतरणबाबत चर्चेसाठी आला होता. त्यावेळी आरोपी नं १ याचा भाऊ हा सदरची ग्रामपंचायतची व्यायामशाळा चालवत असल्याने व्यायामशाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यास त्याने विरोध केला. ग्रामपंचायत सदस्य फिर्यादी यांना त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर तीथुन निघुन जाताना फिर्यादी यांना आरोपीने तुझ्याकडे बघतोच, असे बोलुन धमकी दिली. त्यानंतर काही वेळात आरोपी साथीदार यांना घेवुन आला. सर्वांनी फिर्यादी यांना हाताने तसेच लाथाबुक्यानी मारहाण केल. तसेच आरोपी नं १ याने फिर्यादीच्या गळयाला पकडुन ढकलुन देवुन व शर्ट ओढुन फाडला. तसेच त्यांच्यातील आरोपी नं २ याने त्याच्या हातातील कड फिर्यादीच्या डोक्यात मारून फिर्यादी यांना जखमी केले. दरम्यान इतर सदस्यांनी भांडणे सोडवल्यावर आरोपी व त्याच्या साथीदारांनी जाताना ‘तु बाहेर ये, तुला संपवतोच, कोणी मध्ये येतोय त्याचेकडे भी बघतो’ असे म्हणुन दहशत निर्माण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
मारहाणीची ही घटना गुरुवारी (दि. २८) रोजी दुपारी १२.३० वा. ते २.३० च्या दरम्यान हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालय येथे घडली. फिर्यादी ग्रामपंचायत सदस्य विशाल लक्ष्मण साखरे यांनी आरोपी १) मयुर राजेंद्र साखरे २) ओंकार रामदास मेमाणे, ३) अक्षय गजानन साखरे, ४) सुरज शिवाजी साखरे, ५) राम नारायण साखरे, ६) सुमित पांडुरंग साखरे, ७) रूषीकेश कदम, ८) रोहीत कृष्णा जांभुळकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात १४५५/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३,५०४,५०६,१४३,१४९ क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि गाढवे पुढील तपास करीत आहेत.


















