- आता त्यांचे हात बळकट करण्याची वेळ आली आहे; अपूर्व आढळराव पाटील यांचे आवाहन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०१९) :- भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नी सौ. कल्पनाताई आढळराव पाटील व चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील यांनी आज बुधवार (दि. १७) रोजी प्रचार दौऱ्यानिमित्त भोसरी एमआयडीसी व परिसरातील औद्योगिक वसाहतीस भेट दिली.
यावेळी सौ. कल्पनाताई आढळराव पाटील, चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, फोरमचे सदस्य, उद्योजक, महिला व कामगारवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. कल्पनाताई व चिरंजीव अपूर्व यांनी परिसराला भेटी दिल्या. परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. सौ. कल्पनाताई व चिरंजीव अपूर्व आढळराव यांनी यावेळी औद्योगीक वसाहतीतील नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडी-अडचणी समजवून घेतल्या.

सौ. कल्पनाताई म्हणाल्या की, ”औद्योगिक परिसरातील व कामगारांच्या समस्या मार्गी लावू. उद्योजक व कामगार यांच्यामधील दुवा म्हणून खा. आढळराव काम करतील. खा. आढळराव यांनी परिसरात आतापर्यंत विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.
अपूर्व आढळराव पाटील म्हणाले की, ”खासदार आढळराव यांनी अनेक शासकीय योजनांद्वारे उद्योजक व कामगारांचे हात बळकट केले आहेत. आता शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे हात बळकट करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी मतदान करून, त्यांना बहुमतांनी निवडून आणावे, असे आवाहन अपूर्व आढळराव पाटील यांनी नागरिकांना केले
भोर यांनी महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. लघुउद्योजक व कामगार यांना महापालिका सापत्नपणाची वागणूक देत आहे. उद्योजकांच्या व कामगारांच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी खा. आढळराव हे लोकप्रतिनिधी या नात्येने नेहमीच अग्रेसर असतात. कामगारांच्या व उद्योजकांच्या अनेक बैठकीत त्यांचा हिरारीने सहभाग असतो. शासकीय योजना उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खा. आढळराव हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यामुळे उद्योजक व सर्व कामगार वर्गाने खासदार आढळराव यांनाच मतदान करावे, असे सांगितले.











