न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि १६ एप्रिल १९) :- राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हस्ते आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला १४ मारूती इर्टीगा कारचे वाटप करण्यात आले.
महासंचालक जयस्वाल यांनी आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयास भेट देऊन आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी चर्चा करून कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, श्रीकांत मोहिते, निलम जाधव, राम जाधव, श्रीधर जाधव, अश्विनी राख-केदार यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
नव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मनुष्यबळाची कमतरता आणि वाहने यांची समस्या सोडविण्याचा प्रयत्न शासनाच्या सर्वच स्थरातून सुरु आहे. महासंचालक कार्यालयाकडून पोलीस दलासाठी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी १४ कार पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्यात आल्या. त्याला आज महासंचालकांनी हिरवा झेंडा दाखविला.
आयुक्तालयाच्या उद्घाटना पासून ते आज अखेर केलेल्या कामांचा लेखा-जोखा यावेळी महासंचालकांसमोर मांडण्यात आला. तसेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांची तयारीचे देखील सादरीकरण करण्यात आले. याबरोबरच या साऱ्या कामकाजात आपुऱ्या मनुष्यबळ व गाड्यांचा जो अडथळा निर्माण होत आहे याबाबतचीही माहिती पोलिस महालसंचालकांना देण्यात आली.











