न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मेंदूत रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला आहे.
बाबुराव राठोड असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते ५० वर्षांचे होते. कर्तव्य बजावत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.