- नुक सोसायटीतील इतर फ्लॅटधारकांचाही विश्वासघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- फ्लॅट खरेदी देताना आरोपी क्र १ यांनी फिर्यादी यांना खरेदी खतामध्ये ठरवुन दिलेल्या नियम व अटी प्रमाणे अभिहस्तांतरण व अॅमेनिटीज न देता बिल्डरने अॅमेनिटीजमध्ये बॅकवेट हॉल, स्केटींग रिंग, व बॅडमिंटन कोर्ट बांधुन देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादी व इतर फ्लॅट धारक यांच्याकडुन त्यासाठी रक्कम स्वीकारली आहे. परंतु, अॅमेनिटीज प्रमाणे बॅकवेट हॉल, स्केटींग रिंग, व बॅडमिंटन कोर्ट सोसायटीला दिलेले नाही. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) मंजुर आराखडयामध्ये नमुद केलेल्या जागी न बांधता वेगळयाच ठिकाणी बांधलेला आहे. तसेच बिल्डरने मेंन्टेनन्स चार्ज म्हणुन प्रत्येक फ्लॅटधारकाकडुन दोन वर्षासाठी सुमारे ५०,००० रुपये प्रमाणे घेतलेले आहेत. बिल्डरने सोसायटी हॅड ओव्हर केलेली असुन फिर्यादी व इतर फ्लॅटधारकांकडून मॅन्टेनन्स चार्ज म्हणुन घेतलेल्या रकमेचा कोणताही हिशोब दिलेला नाही.
तसेच बिल्डरने अॅग्रीमेंटमध्ये लिहुन दिलेल्या तारखेला फ्लॅटचा ताबा दिलेला नसुन भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन दिलेले नाही. अॅग्रीमेंट करुन देताना संपूर्ण बिल्डींगचा नकाशा जोडणे बंधनकारक असताना फक्त फ्लोअर प्लॅन जोडलेला असल्याने करार नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी करुन दिलेला नाही. फ्लॅट धारकांकडुन घेतलेल्या आगाऊ रकमा बँकेत स्वतंत्र खाते उघडुन त्यात ठेवलेल्या नसुन त्याचा कोणताही हिशोब दिलेला नाही. सोसायटी नोंदणी झाल्यापासुन ४ महिन्यात संपूर्ण जमीन व इमारती सोसायटीला हस्तांतरीत केलेल्या नसुन कन्व्हेयन्स डिड करुन दिलेली नाही. त्यामुळे बिल्डरने फिर्यादी व नुक सोसायटीमधील इतर फ्लॅटधारकांची अन्यायाने विश्वासघात करुन फसवणुक केलेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.०२/०३/२०१६ पासुन ते दि. १४/०१/२०२४) दरम्यान नुक सोसायटी, ताथवडे येथे घडली. फिर्यादी दयानंद रवाळनाथ पाटील यांनी आरोपी १) बिल्डर खेमचंद भोजवानी २) त्यांचे भागीदार, ३) प्रथमेश डेव्हलपर्स व त्याचे भागीदार ४) गृहप्रकल्पाच्या जमिनीचे मालक यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात पोलिसांनी ४३/२०२४ भा.दं.वि कलम ४०६,४२०, ३४ सह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट सन १९६३ चे कलम ३,४, ५,११,१३,१४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोनि गुन्हे साळुंखे पुढील तपास करीत आहेत.