न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येत्या २४ तारखेला पिपंरी चिंचवड शहरात येणार आहेत. निमित्त ”आदित्य संवाद” कार्यक्रमाचे. या माध्यमातून ते तरुणाईशी संपर्क साधणार आहेत. पिपंरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील मोकळ्या मैदानात सायंकाळी ५.०० वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमास महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद मिळत असून, तरुणाईच्या चौफेर प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे देणार आहेत. राज्यभर सुरू झालेल्या ”आदित्य संवाद” कार्यक्रमाचा समारोप पिपंरी चिंचवड शहरात होणार आहे.
‘आदित्य संवाद’ हा आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्रातील युवा वर्गाला जोडणारा एक नावीन्यपूर्ण संवादात्मक उप्रकम आहे. प्रत्यक्ष संवाद आणि भेटीगाठींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवक वर्गाच्या आशा-आकांक्षा जाणून घेण्याचा त्यांचा मानस आहे. युवावर्गाशी निगडीत सामाजिक चर्चांना योग्य तो आकार देत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आदित्य ठाकरे यांचा मानस आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाईचा आवाज ऐकण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसुन, सर्वच राजकीय शैक्षणिक, क्रीडा, सहकार, सामाजिक, आय.टी क्षेत्रातील तरुण आणि तरुणी यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन युवासेना पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे यांनी केले आहे.











