न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- मावळ लोकसभेतुन शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे खासदार श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. त्यांचा प्रचार शुभारंभ शिवशाही व्यापारीसंघाच्या वतीने नुकताच सुरु झाला.
शिवशाही व्यापारी संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मावळचे उमेदवार बारणे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पिंपरी विधानसभेत मतदारांच्या भेटी-गाठी सुरु केल्या आहेत. शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली प्रचारास सुरूवात करण्यात आली आहे.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, प्रदेश सदस्य मारूती मस्के, भरत इंगळे, खंडु शिरसाठ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.











