न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणा-या ब्रिटीशकालीन हॅरिस पुलाला समांतर पूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पुलाचे काम एप्रिल अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरिस पुलापर्यंतचा त्यांच्या हद्दीतील रस्ता आठ पदरी केला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत नाही.
या प्रकल्पाचा खर्च २२ कोटी ४६ लाख रुपये आहे. पुलाची लांबी २०२ मीटर असून रुंदी १०.५ मीटर आहे. त्याचप्रमाणे पुण्याकडील पोच रस्त्याची लांबी १४५ मीटर असून पिंपरीच्या दिशेची ६५ मीटर आहे. पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.











