न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत काम करणार्या आयटी इंजिनिअरने १२ व्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
रोहित बापुराव पाटील (२८) असे आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनिअरचे नाव आहे. ही घटना वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रॉयल आर. ग्रीन सोसायटीमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रोहित ने आजारपणाला कंटाळुन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचा तपास चालु आहे.











